पावसाळी तक्रारींवर मनपाद्वारे निराकरण २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

0
8

नागपूर दिनांक 12 सप्टेंबर ( प्रतिनिधी )

मागील तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागपूरकरांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन प्राधान्याने कार्य करीत आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. मनपाकडे विविध माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारींवर तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे जवान शहरात सर्वत्र सेवाकार्य बजावत आहेत.

सोमवार १२ सप्टेंबर रोजी विविध झोन अंतर्गत काही ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले व स्वच्छता करीत, रस्ता मोकळा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here