नागपूर दिनांक 18 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)
कॅटवॉकर मिस्टर चार्ल्स विलियम एक्स्पो फॅशन प्रस्तुत कार्यक्रम २१ ऑगस्ट २०२२ रोजी, हॉटेल लि. मेरिडियन, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित करीत आहे. प्रथमच नागपूरात कॅटवॉकर रन-वे-शो आपल्यासमोर घेऊन येत आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून Mr, Miss, Misses, Kids, Transgender या सर्वांचा एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळणार आहे. डायरेक्टर मिस्टर चार्ल्स विलियम तसेच पूर्वा बाराई फ्रेंचाईजी ओनर, नागपूर सिटी पार्टनर शुभांगी झाडे व ऑल स्पोर्टिंग पार्टनर त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम नागपुरात होत आहेत. शो चे डायरेक्शन आणि कोरियोग्राफी ही अभिजीत जैस्वा यांच्या नेतृत्वात पार पाडली जात आहे.
या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून याकरिता मॉडेल्स, डिझायनर आपल्यासमोर येत आहे. कॅटवॉकर या शो चे आयोजन केरला, गोवा, मुंबईला याआधीच झाले आहेत. नागपुरात पहिल्यांदाच या शो चे आयोजन होत आहेत. यामध्ये आयोजक मिस्टर चार्ल्स विलियम हे सहभागी होत असून फॅशन इंडस्ट्री मध्ये उत्कृष्ट नाव आहेत.
हा शो पहिल्यांदाच नागपूर शहरात सुरु असल्यामुळे नागपूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये फार आनंदाचे वातावरण निर्माण होतं असून असं लक्षात दिसून येते आहे. कॅटवॉकर असोसिएशन स्पॉन्सर्स पार्टनर, लॉयन क्लब इन्टरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1, Leo Group The Divine, बुटीबोरी फूड पार्टनर आणि Arena Gym, किड्स, रोचलदास, पार्टनर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या विशाल कार्यक्रमाला श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे नागपूर सिटी पार्टनर शुभांगी झाडेंनी कळविले आहे.






