महाराष्ट्रतील या शहरात दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

0
9

महाराष्ट्र दिनांक 25 मई ( प्रतिनिधी)

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. १५ दिवसांनी याबाबत कारवाई सुरू होणार असल्याचं पोलिसांनी या आदेशात म्हटलं आहे. (helmet compulsory for pillion riders in mumbai)

मुंबई पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. तसंच, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटच वापर करत नाही. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीला मोटर वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच लायसन्सची निलंबीत करण्याची तरतूद आहे, असं मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांना हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या १५ दिवसांनंतर अशा दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here