रेल्वे स्टेशनपुढील परवानाधारकांची मनपाद्वारे पर्यायी व्यवस्था,ईश्वर चिठ्ठीद्वारे २३ दुकानांचे आवंटन

0
12

नागपूर दिनांक 20 मई ( महानगर प्रतिनिधी)

रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपूलाखालील बाधित होणा-या परवानाधारकांपैकी २३ जणांना महामेट्रो द्वारे बांधण्यात आलेल्या दुकानांचे मनपाच्या बाजार विभागाद्वारे शुक्रवारी (ता. २०) ईश्वर चिठ्ठीने आवंटन करण्यात आले आहे.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पर्यायी जागेची आवंटन प्रक्रिया पार पडली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शनात उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. यावेळी मालमत्ता कर विभागाचे सहायक अधीक्षक संजय दहिकर उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन समोरील उडाणपुलाखाली असलेली दुकाने हटवून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत मनपाच्या सभागृहामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता.

त्यानुसार महामेट्रो द्वारे बांधण्यात आलेल्या दुकानांमध्ये सदर परवानाधारकांची पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी उड्डाणपुलाखालील परवानाधारकांना मनपाद्वारे नोटीस देउन त्यांची सुनावणी घेण्यात आली होती.

सुनावणीनंतर परवानाधारकांच्या सूचनेनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे पर्यायी जागेचे आवंटन करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शुक्रवारी (ता.२०) पर्यायी जागेच्या आवंटनाची प्रक्रिया पार पडली.

एकूण परवानाधारकांपैकी स्वेच्छेने २३ परवानाधारकांनी ईश्वर चिठ्ठी प्रक्रियेत सहभाग घेतला. ईश्वर चिठ्ठीत आलेल्या क्रमानुसार परवानाधारकांना पर्यायी जागेतील पसंतीचे दुकान निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार परवानाधारकांनी आपल्या पसंतीची दुकाने निवडली.

दुकानांच्या आवंटन प्रक्रियेसाठी बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, धीरज ढोके व बाजार विभागाच्या कर्मचा-यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here