नागपूर दिनांक १८ मई ( शहर प्रतिनिधी)
नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागादवारे विभागांतर्गत येणा-या परवानेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देउनही त्यावर कुठलीही कार्यवाही न करणा-या परवानाधारकांविरोधात नागपूर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे.
बुधवारी (ता.१८) बाजार विभागाने सीताबर्डी सुपर मार्केट येथील तीन दुकानांचा ताबा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना व उपायुक्त (मालमत्ता) रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात येत आहे.
मनपाच्या बाजार विभागादवारे विभागांतर्गत येणा-या परवानेधारकांकडून थकीत रक्कम वसुलीकरिता १३ एप्रिल २०२२ ते 10 मे २०२२ पर्यंत अभय योजना राबविण्यात आली होती. यानंतर पुढे सात दिवस असे १७ मे २०२२ पर्यंत यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती.
बाजार विभागांतर्गत येणा-या परवानाधारकांना वापर शुल्काचा भरणा न करणा-यांना विभागाद्वारे नोटीस देण्यात आले होते. मात्र नोटीस संबंधी दखल न घेणा-या परवानाधारकांविरुद्ध मनपाने कठोर पाउल उचलत अशा परवानाधारकांचे ओटे, दुकान, जागा ताब्यात घेण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत बुधवारी (ता.१८) पहिली कारवाई करण्यात आली.सुपर मार्केट सीताबर्डी येथील 3 दुकाने बाजार विभागाद्वारे ताब्यात घेण्यात आलेली आहेत.






