उद्या 3 मे ला होणाऱ्या मनसेच्या महाआरती कार्यक्रमाला स्थगिती, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर निर्णय

0
11

महाराष्ट्र दिनांक 2 मे ( प्रतिनिधी)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या महाराष्ट्रातील महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद (Ramadan Eid 2022) आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशानंतर (Raj Thackeray Aurangabad Sabha) स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे उद्याच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here