नागपूर दिनांक 27 दिसंबर (प्रतिनिधि)
मारवाडी युवा मंच शाखा नागपूर तर्फे राज्यस्तरीय बास्केटबॉल विजेती गुंजन निखिल मंत्री यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल व अतुल कोटेचा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्यापार व उद्योग सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग यांच्या हस्ते मारवाडी युवा मंच नागपूर शाखेचे अध्यक्ष कन्हैया मंत्री, सचिव हेमंत शर्मा, कोषाध्यक्ष अश्विन अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, स्मृतीचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुंजन मंत्री च्या यशाचे श्रेय असलेल्या निखिल मंत्री व ममता मंत्री या पालकांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी नरसिंगदास मंत्री, सुनील मंत्री, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, निशांत गांधी, सुधीर बाहेती, संजय पालिवाल, लक्ष्मीनारायण मनियार, संजीव अग्रवाल, दीपक अग्रवाल, सुनील करवा, सुमित माहेश्वरी, अनिल मंत्री, अखिल मंत्री, निखिल मंत्री,प्रकाश हेडा, संजय पुगलीया, अरविंद कोटेचा यांचेसह मंत्री व कोटेचा परिवारातील सदस्य उपस्थित होते. आदी प्रामुख्याने उपस्थित होते.






