नागपूर दिनांक 29 सप्टेंबर प्रतिनिधी: नागपूरात हत्येचे
सुरू झाले असून आज भर दिवसा एका युवकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली ,दारूच्या नशेत हा हत्याकांड झाल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४.१५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. आकाश मातादिन मोरे (वय २२) असे मृताचे नाव आहे.
आरटीओ कार्यालयाजवळ (डिप्टी सिग्नल परिसर) आदिवासी प्रकाश नगर आहे. येथे राहणार आकाश तसेच याच वस्तीतील आरोपी विकी, रोहित आणि त्यांचे साथीदार पुलाखाली दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत आकाशसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी आरोपी विकी आणि रोहित या दोघांनी आकाशवर चाकूने हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आकाशला आरोपींच्या तावडीतून सोडविण्यात आले.
त्याला नंतर मेयोत नेले असता काही वेळेतच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर आदीवासी नगरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची शोधाशोध सुरू होती.






